जेडीएस-काँग्रेस लोकसभा एकत्र लढवणार; युती तुटण्याच्या शक्यतांचे सिद्धरामय्यांकडून खंडन

बंगळुरू : “अंतर्गत कलहांमुळे ‘जेडीएस-काँग्रेस’ सरकार कोलमडणार” या भाजपाद्वारे करण्यात आलेल्या दाव्याला फेटाळत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी, “कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस युती भक्कम असून आगामी लोकसभा निवडणुका देखील आम्ही एकत्रच लढणार आहोत.” असे ठणकावून सांगितले.

यावेळी बोलताना त्यांनी नव्याने समाविष्ट मंत्र्यांबाबत त्यांचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वरम यांच्याबरोबर मतभेद असल्याचा चर्चाना पूर्णविराम देताना, “अशा चर्चा भाजपकडून मुद्दामून पेरल्या जात असून यामागे काहीही करून सत्तेत यायचेच हा हेतू भाजपचा आहे.” असा थेट आरोप केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, भाजपचे जेष्ठ नेते उमेश कट्टी यांनी काही दिवसांपूर्वी “सत्ताधारी पक्षातील १५ आमदार माझ्या संपर्कात असून येत्या आठवड्याभरात काँग्रेस-जेडीएस सरकार कोलमडून भाजप सत्तेत येईल.” असा दावा केला होता.

कट्टी यांच्या या दाव्याचे खंडन करताना सिद्धरामय्या म्हणाले की, “असं काहीही घडणार नसून, आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)