कर्नाटकात जेडीएसला कॉंग्रेसकडे तीन उसने उमेदवार मागण्याची वेळ !

बंगळुरू: कर्नाटकातील कॉंग्रेस बरोबरच्या जागा वाटपात जेडीएस पक्षाला आठ जागा मिळाल्या आहेत. पण यातील तीन मतदार संघात जेडीएस या पक्षाकडे तुल्यबळ उमेदवारच नसल्याने पक्ष प्रमुख देवेगौडा यांनी चक्क कॉंग्रेसला उमेदवार उसने देण्याची गळ घातली आहे. त्यांची ही प्रेमळ विनंती कॉंग्रेसनेही मान्य केली असून आता कॉंग्रेसचे तीन उमेदवार जेडीएसच्या तिकीटावर तीन मतदार संघातून लढणार आहेत. अशा प्रकारची निवडणूक ऍडजस्टमेंट प्रथमच बघायला मिळाली आहे.

कॉंग्रेस बरोबर देवेगौडा यांनी जागा वाटपात अधिक जागांचा आग्रह धरला होता. त्यांच्या हट्टाला पुरे पडत कॉंग्रेसने त्यांना 28 पैकी 8 जागा दिल्या पण उडुपी-चिकमंगळूर, उत्तर कन्नड, आणि उत्तर बंगळुरू या तीन मतदार संघांत त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवारच नाही त्यामुळे देवेगौडांनी क्षमता नसताना कॉंग्रेसकडून जास्त जागा खेचून घेण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. या तीन जागा कॉंग्रेसला परत द्या अशी सुचना कॉंग्रेस नेत्यांनी देवेगौडांना केली पण त्यांनी त्या जागा कॉंग्रेसला परत देण्याऐवजी तुम्हीच आम्हाला तुमचे उमेदवार द्या आम्ही त्यांना आमच्या तिकीटावर उभे करतो अशी विचीत्र ऑफर दिली. ऐनवेळची तडजोड म्हणून कॉंग्रेसने त्यांची ही अट मान्य केली आणि आता कॉंग्रेसचे तीन उमेदवार जेडीएसच्या तिकीटावर तिथे लढणार आहेत.देवेगौडा यांच्या वाट्याला ज्या जागा आल्या आहेत त्यातील तीन जागा त्यांच्या घरातलेच लोक लढवत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here