उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य : जयकुमार रावल

धुळे : नरडाणा (ता.शिंदखेडा) येथील औद्योगिक वसाहतीत उद्योग-व्यवसायासाठी मोठी जागा उपलब्ध आहे. तसेच पाणी, महामार्ग, रेल्वे, वीज, कुशल मनुष्यबळ आदी सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे उद्योजकांनी शिंदखेडा तालुक्यात उद्योग उभारणीसाठी पुढे यावे. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

नरडाणा येथे महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीत पाचशे कोटी रुपये खर्चाच्या वंडर सिमेंट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील उत्पादनाचा शुभारंभ मंत्री रावल यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

-Ads-

मंत्री रावल यांनी सांगितले, वंडर सिमेंटच्या संचालकांना नरडाणा औद्योगिक वसाहतीत गुंतवणुकीची एका भेटीत विनंती केली होती. तसेच आवश्यक सहकार्याचे आश्वासनही दिले होते. त्यानुसार वर्षभरापूर्वी या प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. आता प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले आहे. यामुळे तालुक्यातील हजारावर तरुणांना रोजगाराच्या संधीची उपलब्धता झाली आहे.

नरडाणा औद्योगिक वसाहतीत आतापर्यंत पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे किमान तीन हजार तरुणांना रोजगारांची उपलब्धता झाली आहे. अन्य भागातील उद्योजकांनीही या औद्योगिक वसाहतीत उद्योग सुरू करावेत. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही मंत्री रावल यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)