जायकवाडीला पाणी सोडणारच

संग्रहित छायाचित्र.........

प्रशासनाची भूमिका; पाण्यामुळे वित्त व जीवित हानीला जबाबदार नाही

नगर – उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीला कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. जायकवाडी धरणात 109 दलघमी (3.85 टीएमसी) पाणी तात्काळ सोडण्यात येणार आहे. निळवंडे धरणातून सुरुवातीला 3 हजार क्‍युसेक्‍स या वेगाने पाणी सांडव्याद्वारे प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. नंतर प्रत्येक तासाला 4 हजार क्‍युसेक्‍स विसर्ग वाढविण्यात येणार आहे. तो प्रवरा नदीतून प्रवाहित होणार आहे. त्यामुळे यातून वित्त किंवा जीवित हानी झाल्या त्याला जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, यांच्याकडून उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समुहातील जलाशयांमधील पाणी जायकवाडी धरणात सोडण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. प्रवरा नदीतून 4 हजार क्‍युसेक्‍स या वेगाने पाणी प्रवाहित होणार असल्याने नदीतील पाणी उपसा करण्यासाठी बसविलेली इंजिन, मोटार व इतर सर्वप्रकारचे चीज, वस्तू, साहित्य, तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे.

प्रवाहामुळे या साहित्याचे नुकसान झाल्यास जलसंपदा खाते जबाबदार राहणार नाही. प्रवरा नदीतील विसर्ग जादा दराने असल्याने प्रवाहात उतरण्याचा कोणीही प्रयत्न करु नये, अन्यथा जिवितहानी होवू शकते. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी. प्रवाहामुळे जीवित,वित्त हानी झाल्यास जलसंपदा खाते जबाबदार राहणार नाही.

प्रवरा नदीतून वाहणाऱ्या पाण्यास अडथळा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करु नये. तसेच पाण्याचा कोणत्याही प्रकारे उपसा करु नये, तसे केल्याचे आढळल्यास अथवा करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रवरा नदीत सोडलेले पाणी विना अडथळा जास्तीत जास्त प्रमाणात जायकवाडी धरणात पोहोचेल, यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)