एकही गीत न लिहीता मोदींच्या सिनेमात जावद अख्तर यांचे नाव 

स्वता अख्तर झाले अवाक

मुंबई  – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक चित्रपट प्रकाशित होत असून त्याचा ट्रेलर काल प्रकाशित झाला. त्याच्या श्रेयनामावलीत प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांचे नाव समाविष्ट करण्यात आल्याने स्वत: जावेद अख्तर अवाक झाले आहेत. त्यांनी म्हटले आहे की या चित्रपटासाठी मी एकही गाणे न लिहीता त्यांनी थेट माझे नाव या श्रेयनामालित कसे घातले याचे आश्‍चर्य वाटते. जावेद अख्तर यांनी हा प्रकार ट्विटरवरून कथन केल्यानंतर त्यांना त्याच्यावर जोरदार प्रतिसाद मिळाला. आणि त्यांच्या या कथनाने मोठेच वादळ उठले.

या साऱ्या प्रकाराविषयी चित्रपटाच्या निर्मार्त्यांनी मात्र अजून कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. यावर प्रतिक्रीया देताना प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे की श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचे नाव समाविष्ट करण्यामागे त्यांची बदनामी करण्याचाच प्रकार आहे.दिग्दर्शक ओमंगकुमार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शीत होत असल्याने त्यावरून मोठे वादंगही निर्माण झाले असून अनेक राजकीय पक्षांनी या या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)