अभिनेत्री अनुपमासोबत जसप्रीतचे अफेअर? 

बॉलीवूड आणि क्रिकेट विश्‍वातील नाते नवीन नाही. शर्मिला टागोर-पतौडींपासून हरभजनसिंग-गिता आणि वर्षाभरापूर्वी विविहबंधनात अडकलेल्या आताच्या विराट-अनुष्का अशी अगणित उदारहणे देता येतील. यासह काही जोडपी एकत्रित आली, तर काहींच जुळता-जुळता राहून गेले. आता भारतीय संघातील आणखी एका युवा गोलंदाजाचे एका अभिनेत्रीशी अफेअर असल्याची चर्चा सुरू आहे. भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्‍वर यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे बोलले जात आहे.

आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानावर आहे. सध्या सुरू असलेल्या विश्‍वचषक सामन्यात या युवा क्रिकेटपटूसाठी स्टेडियममध्ये बसलेल्या फॅन्सकडून “माझ्याशी लग्न कर’ असे फलकही झळकावले जातात. मात्र जसप्रीतचा जीव जडला आहे, तो अभिनेत्री अनुपमावर. “प्रेमम’ या मल्ल्याळम चित्रपटामुळे अनुपमा प्रकाशझोतात आली. जसप्रीत आणि अनुपमा हे एकमेकांना ट्विटरवर फॉलो करत असल्याने चाहत्यांच्या माना वळल्या. मात्र मात्र, अनुपमाने असे काही नसल्याचे सांगत या अफवांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वीही दाक्षिणात्य अभिनेत्री राशी खन्नासोबतही बुमराहचे नाव जोडले जात होते. मात्र तिनेही या अफवा धुडकावून लावल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)