वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जायबंदी

मुंबई – आगामी विश्‍वचषकाच्या दृष्टीने आयपीएलमध्ये खेळाडूंनी आपला फिटनेस सांभाळावा, अशी सूचना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने केली आहे. मात्र रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स दरम्यान झालेल्या सामन्यात त्याच्यासह भारतीय पाठिराख्यांच्या हृदयाचा ठोका चुकला.

मुंबई कडून अखेरचे षटक ताकताना जसप्रीत बुमराहचा खांदा दुखावला. डावाच्या अखेरच्या षटकातील अखेरचा चेंडू अडवण्याच्या नादात तोल जाऊन तो कोसळला. ज्यामुळे त्याचा डावा खांदा दुखावला. त्याची दुखापत किती गंभीर आहे ते अद्याप कळू शकले नाही. मात्र डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे तो चांगलाच कळवळला. डॉक्‍टरांनी मैदानात धाव घेतली, तर दिल्लीचा फलंदाज ऋषभ पंतही बुमराहची चौकशी करण्यासाठी धावला. यावरुन विश्‍वचषका बाबत भारतीय खेळाडू किती सजग आहे ते दिसून आले.

यावेळी बुमराहच्या दुखापती बाबद बोलताना मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापकाने सांगितले की, बुमारहची दुखपात गंभीर नसून पुन्हा एकदा दुखपतीची स्थिती पाहिली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)