अनुप आणि जसलीनच्या नात्याला कधीच मान्यता देणार नाही: जसलीनचे वडील 

अनुप जलोटा आणि जसलीन यांच्यामधील नातं बिग बॉस १२ च्या माध्यमातून समोर आलं तेव्हापासून भजन गायक चर्चेचा विषय ठरत आहेत. बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यापासून त्यांनी सर्वांनाच धक्का दिला. भजन गाऊन लोकांचं मनोरंजन करणारे अनुप बिग बॉसच्या घरात शिष्य जसलीनसह आले. घरात आल्यानंतर दोघांनीही आपणं एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबूली दिली. एका खाजगी वृत्तवाहिनीने जसलीनचे वडील केसर मथारू यांची मुलाखत घेऊन आपल्या मुलीच्या नात्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया घेतली.
सध्या सर्वत्र अनुप- जसलीन यांच्या नात्याबद्दल बोलले जात असताना जसलीनच्या वडिलांनी मात्र या नात्याबद्दल यापूर्वी काहीही माहित नव्हतं. ‘मला फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की, गुरू शिष्याच्या स्वरूपात दोघं बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत. मात्र तिथे गेल्यानंतर वेगळंच चित्र पाहायला मिळालं. या नात्याबद्दल जेव्हा पासून आम्हाला कळलं तेव्हापासून संपूर्ण कुटुंबिय हादरून गेले आहेत.’
पुढे ते म्हणाले की, ‘हे माझ्या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी स्वप्नवत होतं. त्या दोघांनी प्रेमाची कबुली दिल्यावर आमच्या घरात स्मशान शांतता पसरली. लगेचच नातेवाईकांचे फोन यायला सुरूवात झाली. माझ्या मित्रांनी फोन करून मला सुनावले’
या नात्याचा केसर स्वीकार करतील का असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की, ‘मी कधीही अनूप आणि जसलीन यांच्या नात्याला होकार देणार नाही. अनूप यांना नाही पण माझ्या मुलीला मात्र मी नक्की विचारेन. तिने जर होकार दिला तर मी त्यांच्या मार्गात येणार नाही. मात्र मी कधीच हे नातं मान्य करणार नाही. जसलीनच्या या वागणुकीमुळे मी फार दुखावलोय. डोक्यात अनेक विचार येतायेत. पण आता लोकांचा सामना तर करावाच लागेल.’ शेवटी केसर मथारू म्हणाले की, ‘दोघांनी बिग बॉसच्या घरात जाताना स्वतःची इमेज खराब केली, पण आता त्यांनी ही इमेज सुधारली पाहिजे. तसेच त्यांनी फेअर गेम खेळला पाहिजे.’

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)