बरखा बिश्‍त बनणार जशोदाबेन

बायोपिकच्या जमान्यामध्ये “ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ आणि “ठाकरे’ या दोन्ही सिनेमांना प्रेक्षक आणि विश्‍लेषक दोघांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकची तयारी जोरात सुरु आहे. मोदींच्या भूमिकेत विवेक ओबेरॉय दिसणार ही गोष्ट आता सगळ्यांना माहित झाली आहे.

आता मोदींच्या पत्नीच्या रोलमधील ऍक्‍ट्रेसचे नावही समोर आले आहे. अभिनेत्री बरखा बिश्‍त ही या रोलसाठी निवडण्यात आली आहे. मोदींच्या बायोपिकचे प्रारंभीचे शुटिंग अहमदाबादेत होणार आहे. हे शहर तिच्यासाठी नवीन नाही. तिचे पती अहमदाबादचेच आहेत. तिला या रोलसाठी गुजराथी बोलायला शिकायला लागणार आहे.

बरखाने मोदींच्या जीवनप्रवासाबाबत वाचन करायलाही सुरुवात केली आहे. जशोदाबेनबाबत आतापर्यंत फारशी माहिती प्रसार माध्यमांमध्ये उपलब्ध नाही, त्यामुळे जी माहिती मिळते आहे, त्याचा सविस्तर अभ्यास बरखाला करायचा आहे. जशोदाबेनच्या व्यक्तिकमत्वाचा अभ्यास करताना अनेक छटा साकारायच्या असल्याने ही भूमिका वाटते तितकी सोपी नाही, याची बरखाला चांगलीच जाणीव आहे. मात्र आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्यासाठी तिचा अभ्यास सुरु झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)