रायुगु लघुग्रहावर उतरले जपानी अंतरिक्ष यान हायबुसा-2

टोकियो (जपान): जपानचे अंतरिक्ष यान हायबुसा-2 रायुगु या लघुग्रहावर उतरले आहे. जपानी अंतरिक्ष संस्था जेएएक्‍सए ने याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी सकाळी हायबुसा-2 वरून आलेल्या संदेशानुसार ते रायुगु लघुग्रहावर उतरल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे.

2 डिसेंबर 2014 रोजी हायबुसा-2 तानेगाशिमा अंतरिक्ष केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आले होते. गेल्या वर्षी जून महिन्यात ते रायुगुच्या कक्षेत पोहचले होते आणि त्याच्यापासून 20 किमी अंतरावरून त्याच्याभोवती प्रदक्षिणा मारू लागले. ऑक्‍टोबर महिन्यात रायुगुवर उतरण्याची त्याची योजना योग्य जागा न मिळाल्याने पुढे ढकलण्यात आली होते. ते आता त्यावर सफलतापूर्वक उतरले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पृथ्वीपासून सुमारे 34 कोटी किमी अंतरावर असलेला रायुगु हा सूर्यमालेतील सर्वात प्राचीन लघुग्रह आहे. सन 1999 मध्ये त्याचा शोध लावण्यात आला. 900 मीटर व्यासाच्या या लघुग्रहाचे वजन 450 अब्ज किलोग्राम असून पृथ्वीच्या अतिशय जवळ असल्याने भविष्यकाळात त्याची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. रायुगु हे त्याचे नाव एका जपानी लोककथेमधील महालावरून ठेवण्यात आले आहे.

हायबुसा-2 ने पाठवलेल्या माहितीने सूर्यमालेच्या उत्पत्ती आणि विकासाचे गूढ उलगडू शकेल असे शास्त्र्रज्ञांचे मत आहे. सन 2020मध्ये हायबुसा-2 आपली कामगिरी आटोपून पृथ्वीवर परत येणार आहे. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)