#Video : कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठात जपानी कलावस्तूंचे प्रदर्शन

कोल्हापूर – कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागात आज एक दिवसीय विविध जपानी कलावस्तूंचे प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठातील वि.स. खांडेकर भाषा भवन इमारतीच्या प्रवेश दालनात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रदर्शनात जापनीज नागरिकांच्या शैक्षणिक वस्तू, जीवनशैली उघडणाऱ्या वस्तू, सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या वस्तू यांसोबतच कलाकृती आणि शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले आहे. या प्रदर्शनात चाळीसहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. हे एकदिवसीय जपानी कलाकृती प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर असल्याचं आयोजकांनी सांगितले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)