दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जाह्नवी कपूर हिने बॉलीवूडमध्ये नुकतेच पाय ठेवले आहेत. तिने धर्मा प्रोडक्शनचा चित्रपट ‘धडक’ द्वारे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट भलताच यशस्वी झाला आहे. या चित्रपटाने ७० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.मराठी चित्रपट ‘सैराट’ चा हा हिंदी रिमेक होता.

पहिल्या चित्रपटामुळेच जाह्नवी अनेक चाहत्यांची आवडती अभिनेत्री झाली आहे. तिच्या जवळच्या मित्रांनी तिचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. तिचा तो व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. त्याततील तिचे हावभाव हे अनेकांच्या ह्र्दयाचा ठोका चुकवण्यासाठी पुरेसे आहेत.

जाह्नवीची स्वतःची वेगळी फॅशन स्टाईल आहे. नुकतेच तिने ग्रेजीया मॅगझीनसाठी फोटोशूट केले. ती त्यांच्या सप्टेंबरच्या मॅगझीनसाठी कव्हरगर्ल देखील आहे. या ग्लॅमरस शूटचे ‘बिहाईंड द सीन’ देखील सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)