एससी/एसटी बिलाच्या मुद्दयावरून राहुल गांधीचा प्रधानमंत्री मोदींवर हल्ला

नवी दिल्ली – एससी/एसटी बिलाच्या (अॅट्रोसिटी विधेयकासाठी) विरोधात दिल्लीच्या जंतर-मंतर वर आंदोलन चालू आहे. या आंदोलनात सीपीएमचे सीताराम येचुरी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि एससी/एसटी बिलाच्या मुद्दयावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला.

राहुल गांधी यांनी म्हटले की, जर मोदींच्या मनामध्ये दलितांविषयी जागा असती तर आज दलितांसाठी अनेक धोरणे असली असती. जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये ‘दलितांना सफाई करून आनंद मिळतो’ असे लिहले होते.

-Ads-

दिल्लीतील आंदोलन हे एससी/एसटी अॅक्टला नवव्या सूचीमध्ये टाकावे यासाठी चालू आहे. त्यामुळे या अॅक्टमध्ये कोणालाही तसेच अगदी कोर्टाला देखील बदल करता येणार नाही. राहुल यांनी पुढे म्हटले की, एससी/एसटी अॅक्ट हा मोदी यांनी रद्द होऊन दिला. ज्या न्यायाधीशांनी हा निर्णय सुनावला त्यांना प्रधानमंत्री यांनी बक्षिस दिले. नरेंद्र मोदी यांच्या विचारात दलित समाविष्ट नाही आहेत. एससी/एसटी अॅक्ट हे काँग्रेसने दिले पण मोदी सरकारने हे अॅक्ट बदलले परंतु काॅग्रेस या अॅक्टचे संरक्षण करेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)