जनसंघर्ष यात्रेतून सरकारविरोधी एल्गार : ना. विखे पाटील

File Photo

दुष्काळाची दाहकता

पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळाची दाहकता वाढली आहे. पाण्याअभावी खरीप हंगाम वाया गेला. शेती उत्पादीत मालाला कोणताही दर मिळत नाही. नैसर्गिक संकटांबरोबरच आर्थिक संकटही शेतकऱ्यांवर ओढवले आहे. जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, खरीप हंगामात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज तातडीने माफ करावे, पीक विमा योजनेच्या बदललेल्या नियमांमुळे शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहण्याची आलेली वेळ, या प्रमुख समस्यांचाही आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राहाता – जनसंघर्ष यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी येथे पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात या जनसंघर्ष यात्रेला सामान्य माणसाचा प्रतिसाद मिळाला आहे. यानिमित्ताने सरकारविरोधातील तीव्र भावना अनुभवता आल्या. मागील साडेचार वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचा लाभ सर्वसामान्यांना झाला नाही. याची तीव्र प्रतिक्रीया नागरिकांमधून उमटत असल्याचे यात्रेच्या निमित्ताने दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, दुष्काळाचे तीव्र सावट दिसून येत असतानादेखील सरकार अद्यापही कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही. सकारची फसलेली कर्जमाफी योजना, इंधनाचे वाढलेले दर, घरगुती गॅसच्या वाढलेल्या किंमती या बरोबरच मागील साडेचार वर्षांत सरकारच्या निर्णयांचा कोणताही लाभ समाजातील घटकांना झालेला नाही. असे म्हणत ना. विखे पाटील यांनी लक्ष वेधले.

-Ads-

नऊ ऑक्‍टोबर रोजी सकाळी यात्रेचे संगमनेरात आगमन होवून जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर प्रमुख नेते पाथर्डी येथील जाहीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विरोधीपक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)