जानकर यांनीही युतीला ‘अल्टिमेटम’ द्यावा : शेट्टी

युती आणि आघाडीने झुलवत ठेवल्याने चौथी आघाडी?


महादेव जानकर-राजू शेट्टी यांची भेट

पुणे – कॉंग्रेस-राष्ट्रवादीने ज्याप्रमाणे जागा वाटपात स्वाभिमानी संघटनेला झुलवत ठेवले आहे, तशीच अवस्था युतीचे मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाची झाली आहे. या पक्षाचे नेते महादेव जानकर यांना देखील काहीच मिळालेले नाही. त्यातच महादेव जानकर आणि राजू शेट्टी यांची पुण्यात बैठक पार पडली. याचाच अर्थ आणखी एखादी वेगळी मोट या निवडणुकीत पाहायला मिळणार असल्याची शक्‍यता आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, जानकर यांनीही युतीला “अल्टिमेटम’ द्यावा, असा सल्ला खासदार शेट्टी यांनी दिल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.

आगामी लोकसभेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी केली आहे. त्याला अनेक छोट्या पक्षांचा पाठिंबाही आहे. या छोट्या पक्षांना जागा सोडण्याबाबत अजून कुठलाही अंतिम निर्णय झाला नाही. त्यात स्वाभिमानी संघटनेने तर “अल्टिमेटम’ दिला आहे. याबाबत मंगळवारी स्वाभिमानी संघटनेची बैठक पुण्यात झाली. दरम्यान, दुसरीकडे भाजप-शिवसेना युतीतील मित्र पक्ष राष्ट्रीय समाज पक्षालासुद्धा युतीकडून कुठलेही आश्‍वासन मिळालेले नसल्याने पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक पुण्यात घेतली. त्यामुळे आघाडी आणि युतीतील नाराज मित्र पक्षांच्या बैठका पुण्यात होतात, त्यात खासदार राजू शेट्टी आणि महादेव जानकर हे स्वतंत्रपणे भेटतात, याचा अर्थ नक्‍कीच राजकारणात पुढे काही तरी वेगळे घडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

-Ads-

या बैठकीबाबत राजू शेट्टी यांना थेट विचारले असता, “महादेव जानकर हे माझे चांगले मित्र व सहकारी आहेत. आज ते सुद्धा पुण्यात आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे कळल्याने मी त्यांची भेट घेतली. भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसली, तरी सध्या आम्ही दोघेही सम दु:खी आहोत,’ असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. त्यांनासुद्धा युतीने काही दिलेले नाही.आम्हालाही काही मिळालेले नाही. आम्ही तर “अल्टिमेटम’ दिला आहे. आता त्यांनी सुद्धा “अल्टिमेटम’ द्यावा आणि बाहेर पडावे यातच त्यांचे भले आहे, असा सल्ला त्यांनी जानकर यांना दिला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)