जान्हवीच्या स्टायलिश लुकवर चाहते फिदा

चित्रपटसृष्टीत आपल्या डेब्यू चित्रपटापासूनच चाहत्यांच्या मनाची धडकन बनलेल्या “धडक’ गर्ल जान्हवी कपूर सध्या खूपच व्यस्त असते. कारण ती एक आव्हानात्मक अशी भूमिका साकारण्याच्या तयारीत आहे. ही खास तयारी सुरू आहे ती, पहिली महिला आयएएफ पायलट गुंजन सक्‍सेना यांच्यावर आधारित असलेल्या बायॉपिक चित्रपटाची. तरीही ती सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

जान्हवी कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक पीच कलरच्या पिंटेड साडीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच क्‍यूट आणि स्टायलिश दिसत आहे. जान्हवीच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी “फॅनटॅस्टिक लुक’ अशी कॉमेंट्‌स देत तिची स्तुती केली आहे. या फोटोत जान्हवीने पीच कलरच्या साडीत केस मोकळे सोडले आहेत. तसेच मेटल इयररिंग्समुळे तिची सुंदरता आणखीनच डोळ्यात भरते.

दरम्यान, वर्कफ्रंटबाबत सांगायचे म्हटल्यास जान्हवी लवकरच “रूहीअफजा’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांनी काम केले आहे. यात जान्हवी कपूर डबल रोल साकारणार आहे. याशिवाय ती करण जोहरच्या “तख्त’ चित्रपटातही काम करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)