जान्हवी कपूर पुढच्या सिनेमामध्ये डबल रोलमध्ये

श्रीदेवीची कन्या जान्हवी कपूर आपल्या पुढच्या सिनेमामध्ये डबल रोल साकारणार आहे. श्रीदेवीच्या गाजलेल्या सिनेमांमध्ये “चालबाज’ हा महत्वाचा सिनेमा होता. हेमा मालिनीच्या “सीता और गीता’चा रिमेक असलेल्या “चालबाज’मध्ये श्रीदेवीनेही डबल रोल साकारला होता. आता आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकून जान्हवी देखील डबल रोल साकारणार आहे. “रुह अफ्जा’ हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा असून त्याचे डायरेक्‍शन दिनेश विजन करणार आहे.

दिनेश विजनच्या “स्त्री’ या हॉररपटात राजकुमार राव होता. त्या “स्त्री’मधील राजकुमार रावची व्यक्तिरेखा “रुह अफ्जा’मध्ये पुढे कायम राहणार आहे. सिनेमाचे नाव जरी “रुह अफ्जा’ असले तरी त्यात जान्हवीच्या पात्रांचे नाव रुही आणि अफसाना असणार आहे. डबल रोल असल्यामुळे एकसारख्या दिसणाऱ्या दोन मुलींमुळे निर्माण होणारा गोंधळ तर यात असेलच, त्याशिवाय हॉररचा तडकाही असेल. नवविवाहित जोडप्यातील वधूला वश करणाऱ्या एका गायिकेच्या भूताची ही कथा आहे. जून महिन्यात या सिनेमाचे शुटिंग सुरू होईल आणि पुढच्या वर्षी 20 मार्चला सिनेमा रिलीज होईल, असे दिनेश विजननी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)