ईशान खट्टरसाठी जान्हवी कपूर बनली शेफ; व्हिडिओ शेअर

अभिनेता ईशान खट्टर व अभिनेत्री जान्हवी कपूरने ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘धडक’ चित्रपटाने भारतात ५० करोडचा आकडा पार केला होता. या चित्रपटामधील त्यांची केमिस्ट्री सुद्धा प्रेक्षकांना खूप भावली. या चित्रपटानंतर  त्या दोघांमध्ये खूप चांगलं बॉण्डिंग आहे. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्यांनी ही चर्चा चुकीची असल्याचे करण जोहरचा चॅट शो कॉफी विद करण शोमध्ये जान्हवीने सांगितले की, ईशान फक्त खूप चांगले मित्र आहे. तसेच याबद्दल ईशाननेदेखील याच शोमध्ये आम्ही मित्र असल्याचे सांगितले.

दरम्यान, ईशान खट्टरने नुकतीच इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे ज्यात जान्हवी काहीतरी पदार्थ बनविताना दिसते आहे. या स्टोरीसोबत ईशानने शेफ जान्हवी असे म्हटले आहे. या व्हिडिओत जान्हवीने ‘ग्रे टॉप आणि प्रिंटेड स्कर्ट’ परिधान केला होता. ईशान खट्टरने शेअर केलेल्या पोस्टमुळे पुन्हा सोशल मीडियावर ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाल्या आहे.

 

View this post on Instagram

 

Chef J🍳✨ @janhvikapoor Credit @sarajanhvi

A post shared by Bollywood Happy (@boliywoodhappy) on

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)