जम्मू काश्मीर – बारामुल्लामध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

file photo

नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात मंगळवारी घेराव आणि शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवादी याच्यांत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

सूत्राच्या माहितीनुसार दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर राष्ट्रीय राइफल (आरआर), जम्मू काश्मीर पोलीसांचे विशेष पथक (एसअोजी) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) च्या जवानांनी सोपोरमधील तुज्जर शरीफमध्ये घेराव घातला आणि शोधमोहिम सुरू केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुरक्षा दलाचे जवान दहशतवादीच्या ठिकाणाजवळ जात असताना दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देताना दहशतवादी आणि सुरक्षा दला दरम्यान झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं.

सुरक्षिततेच्या कारणास्तव मोबाइल इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. तसेच सोपोरमधील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेशसुध्दा देण्यात आले आहेत. तसेच या भागात सुरक्षा दलाच्या जवानांकडून शोधमोहिम चालूच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)