जम्मूू-काश्मीर : सोपोरमधील चकमकीदरम्यान सुरक्षादलाने 2 आतंकवाद्याचा केला खात्मा

संग्रहित छायाचित्र

श्रीनगर : जम्मू काश्मीर मधील सोपोर जिल्ह्यात भारतीय सुरक्षादलाच्या जवानांनी दोन आतंकवाद्याचा खात्मा केला आहे. सावधगिरी म्हणून या भागात सुरक्षादलाच्या टीमकडून शोधमोहिम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षादलाला गुरूवारी रात्री काही आतंकवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भारतीय जवानांनी शोधमोहिम सुरू केली. दोन्ही आतंकवादी सोपोरमधील द्रुसू गावात लपून बसले होते. य़ानंतर सुरक्षादलाच्या जवानांनी या परिसराला वेढा घालत दोन्ही आतंकवाद्यांचा खात्मा केला.

यावेळी आतंकवाद्यांकडून सुरक्षादलावर गोळीबारही करण्यात आला. त्याला सुरक्षादलाने चोख प्रत्युत्तर दिले. यादरम्यान झालेल्या चकमकीत दोन्ही आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)