जम्मू-काश्मीर मध्ये चालू वर्षात सुरक्षादलाने केला 116 आतंकवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीर मध्ये सुरक्षादलाने चालू वर्षात आतापर्यत 116 आतंकवाद्यांना यमसदनी धाडले आहे. मागील वर्षी सुरक्षादलाने एकूण 213 आतंकवाद्यांचा खात्मा केला होता. या आकडेवारीच्या आधी मागील महिन्यामध्ये गृह मंत्रालयाने राज्यात आतंकी घटनासंबंधात आणखी एक आकडेवारी जाहिर केली होती. त्यानुसार जम्मू काश्मीर मध्ये राज्यपाल शासन लागू झाल्यानंतर आतंकवादी हिंसेच्या घटना कमी झाल्या आहेत. पण दगडफेक या सारख्या घटना काही प्रमाणात वाढल्या आहेत.

गृह मंत्रालयाकडून जाहिर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 16 जून ते 15 जुलै यादरम्यान आतंकवादी हमले कमी झाले आहेत. परंतु रमजान महिन्या दरम्यान जेव्हा सुरक्षादलाने त्याचे अभियान स्थगित केले होते तेव्हा आतंकवादी हमल्यांची संख्या जास्त होती.

रमजान महिन्यामध्ये शस्त्रसंधी लागू होती. रमजान महिना 16 मे पासून सुरू झाला होता. केंद्र सरकारकडून सस्पेंशन आॅफ आॅपरेशन या मिशनअंतर्गत  शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. महबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारचा पांठिबा भाजपाने काढल्यानंतर 20 जूनपासून राज्यात राज्यपाल शासन सुरू झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)