भूस्खलनामुळे काश्मीरमधील ‘श्रीनगर-जम्मू’ राष्ट्रीय महामार्ग बंद

श्रीनगर – जम्मू-काश्मीर मध्ये 300 किलोमीटर लांब श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग मंगळवारी सकाळी झालेल्या भूस्खलनामुळे बंद करण्यात आलेला आहे. हा राष्ट्रीय महामार्ग काश्मीर घाटी ला पूर्ण देशांशी जोडतो. राष्ट्रीय महामार्गावरील पोलिसांनी माध्यमांना ही माहिती दिली.

भूस्खलनामुळे काही निर्बंधासह महामार्गावरील रखडलेल्या वाहतूकीसाठी 34 किमी लांब श्रीनगर-लेह आणि 86 किमी लांब एेतिहासिक मुगल मार्ग खुला करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही श्रीनगर-जम्मू महामार्गावरील वाहतूक थांबविली आहे कारण आज सकाळी रामबन मध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. सीमा रस्ता संघटना (Border Roads Organisation) आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याव्दारे भूस्खलनामुळे मार्गावर आलेला ढिगारा बाजूला काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे’.

रस्त्यावरील ढिगारा बाजूला काढण्यास अजून काही तास लागतील. रस्त्यावरील ढिगारा साफ होताच महामार्ग वाहतूकीसाठी पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)