जम्मू-काश्मीर : माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या घरात कार घुसवली

सुरक्षारक्षकांनी चालकावर केला गोळीबार

श्रीनगर – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्यात घरात एकच खळबळ उडाली, जेव्हा एका कारचालकाने जबरदस्तीने त्यांच्या घरात घूसून तो तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस सुरक्षारक्षकांनी कार चालकावर गोळीबार केला. यामध्ये कारचालकाला गोळी लागली.

-Ads-

मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक व्यक्ती फारूख अब्दुल्ला यांच्या घरात कार घुसवत होता. त्याने घराच्या लाॅबीपर्यत कार घुसवली होती. सुरक्षारक्षकांनी त्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु कारचालक काही थांबला नाही. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला गोळी मारली. मारला गेलेला व्यक्ती हा मेंढर गावचा रहिवासी असल्याचे समजते आहे.

ही घटना घडली तेव्हा फारूख अब्दुल्ला हे घरात नव्हते. या घटनेत एक सुरक्षारक्षकसुध्दा जखमी झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)