जम्मू-काश्मीर : सुरक्षादलाची आतंकवाद्यांशी चकमक

चकमकीत १ जवान शहीद तर २ जवान जखमी

जम्मू-काश्मीर – जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील बटमालूमध्ये आतंकवाद्यासोबत झालेल्या चकमकीत पोलिस विभागातील १ एसओजी जवान शहीद तर सीआरपीएफचे २ जवान जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी ही चकमक झाली. जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीजीपी एसपी वैद्य यांनी ही माहिती दिली आहे.

एसपी वैद्य यांनी ट्विट केले आहे की, रविवारी पहाटे ही चकमक सुरू झाली. त्यामध्ये १ जवान शहीद तर २ जवान जखमी झाले. अजूनही ही चकमक सुरूच आहे. बटमालूमध्ये आणखी काही आतंकवादी लपून बसले असण्याची शक्यता आहे. जवानांनी या संपूर्ण परिसरास वेढा घातला असून शोधमोहिम सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)