जम्मू काश्मीर : चेनाब नदीत बस कोसळली; 13 जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीर मधील किश्तवाड जिल्ह्यात शुक्रवारी एक मिनी बस चेनाब नदीजवळील दरीत कोसळली. अपघातात 13 यात्रेकरूं मरण पावले आहेत तर 13 जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला. केशवान कडून किश्तवाडकडे जाणाऱ्या मिनी बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस चेनाब नदीजवळील 300 फूट खोल दरीत कोसळली’.

बचावकार्याचे नेतृत्व करणारे किश्तवाडचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक राजिन्दर गुप्ता यांनी सांगितले की, ‘आतापर्यंत अपघातात 13 जणांचा मृत्यू आणि 13 जण जखमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातग्रस्त बस मध्ये 30 पेक्षा अधिक यात्रेकरू होते. घटना झाल्याची समजताच बचावकार्य सुरू करण्यात आले होते’.

दरम्यान किश्तवाड येथील एक महिन्यांतील ही तिसरी मोठी दुर्घटना आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)