अनंतनागमध्ये चकमकीदरम्यान जवान शहीद, लष्कर-ए-तोयबा चा कमांडर ठार

नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात गुरूवारी सुरक्षा दल आणि दहशतवादी याच्यांत झालेल्या चकमकीदरम्यान भारतीय जवान शहीद झाला आहे. या चकमकीदरम्यान लष्कर-ए-तोयबा चा कमांडर ठार झाला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांना अनंतनागच्या डूरु परिसरात दहशतवाद्यांच्या हालचाली संबंधी माहिती मिळाली होती. त्यानंतर झालेल्या चकमकीदरम्यान लष्कर-ए-तोयबा चा कमांडर अबू उकाशा याला भारतीय जवानांनी कंठस्थान घातले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सेनेचे तीन जवान जखमी झाले असून त्यापैकी एका जवानांचा रूग्णलयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलींसाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले की, ‘गुप्तचराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे आॅपरेशन करण्यात आले. या अभियानादरम्यान सुरक्षा दलाला एका जवानास गमवावे लागले तर एक दहशतवादी मारला गेला’. सध्या अनंतनाग, श्रीनगर आणि बडगाम जिल्ह्यात चालू असलेल्या चकमकीमुळे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)