जम्मू-काश्मीर : बारामूलामध्ये भारतीय संरक्षण दलाने घुसखोरीचा कट उधळला 

संग्रहित छायाचित्र

एका दहशतवाद्याचा केला खात्मा

नवी दिल्ली – काश्मीरमधील बारामूलातील उरीमध्ये भारतीय संरक्षण दलाने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळला आणि भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले.

-Ads-

संरक्षण दलाला उरी येथील कस्तुरी नालाजवळ एलअोसीवर संशयास्पद हालचाल दिसून आली. त्यानंतर हा  दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न असल्याचे लक्षात आले असता संरक्षण दलाने केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्या भागात अजूनही चकमक सुरू आहे.

दरम्यान शनिवारीच कुपवाडामध्ये  घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना भारतीय संरक्षण दलाच्या सैनिकांनी कंठस्नान घातले होते. गुरूवारी संरक्षण दलाच्या डीजीएमअो यांनी सीमेवर पाकिस्तानकडून दहशतवाद्यांची होत असलेल्या घुसखोरीबदल पाकिस्तानच्या डीजएमअो यांच्याशी बोलणी केली होती. मात्र तरीदेखील पाककडून शस्त्रसंधीच उल्लघंन होतच आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)