जम्मू काश्मीर : बांदीपुरा येथे सुरक्षा दल आणि दहशवाद्यांमध्ये चकमक

दोन दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली – जम्मू काश्मीर मधील बांदीपुरा जिल्ह्यात गुरूवारी सकाळी भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्या चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. तसेच सुरक्षा दलाने दोन ते तीन दहशतवाद्यांना घेराव घातला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अजूनही भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरूच आहे. पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार ‘दहशतवादी लपून बसल्याची माहिती कळताच जवानांनी बांदीपोरा येथील हाजिन परिसरात शोधमोहिम सुरू केली. या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. या गोळीबारला भारतीय सुरक्षा दलानी चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून अजूनही चकमक आणि शोधमोहिम चालू अाहे’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)