जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. दरम्यान, अद्यापही या भागात शोधमोहीम सुरु आहे.

बडगाम जिल्ह्यातील हपतनार परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यानुसार या परिसरात शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु केला. जवानांनीही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.