जम्मू-काश्मीर – चकमकीत तीन दहशतवादी ठार, एक जवान शहीद

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरच्या बडगाम आणि अनंतनाग जिल्ह्यात गुरूवारी दहशतवाद्यांच्या विरोधातील शोधमोहिमे दरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीदरम्यान तीन दहशतवादी मारले गेले आहेत. तर यामध्ये  एक भारतीय जवानदेखील शहीद झाला आहे.

अधिकृत सूत्राच्या माहितीनुसार दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर खात्याकडून मिळाल्यानंतर सेना, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलीसांच्या विशेष मोहिम पथकाने सकाळी बडगाम जिल्ह्याच्या पनजान गावात संयुक्त अभियान सुरू केले. याच दरम्यान एका धार्मिक स्थळात दहशतवादी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत सुरक्षा दलाच्या जवांनानी गोळीबार केला. दोन्हीकडून झालेल्या या गोळीबारा दरम्यान दोन दहशतवादी मारले गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशाचप्रकारे आणखी एक शोधमोहिमेत अनंतनाग जिल्ह्यातील शाहाबाद मध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाले. यापैकी एकाचा रूग्णलयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरक्षादलाच्या या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला आहे, तर इतर दहशतवादी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पोलीस प्रवक्ताच्या माहितीनुसार हे अभियान समाप्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)