जामखेड बसस्थानकात वाहकास मारहाण

file photo

जामखेड – खर्डा बसस्थानकात तरुणास बाजूला सरक, असे म्हणटल्याचा राग आल्याने त्याने वाहकाला अरेरावी करत मारहाण केली. याप्रकरणी या युवकाविरोधात जामखेड पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या जामखेड आगारातील वाहक रमेश बन्सी जायभाय हे चालक गफूर पठाण यांच्या समवेत जामखेड-धनेगाव बस (क्र. एमएच- 12 ईएफ- 8623) घेऊन सकाळी साडेआठ वाजता जामखेड बसस्थानकातून निघाले होते. पावणेदहाच्या सुमारास ही बस खर्डा बसस्थानकात आली. त्यानंतर चालक व वाहक कंट्रोलरच्या केबीनमध्ये नोंद करण्यास गेले.

-Ads-

यावेळी केबीनच्या दरवाजासमोर खर्डा येथील युवक विवेक भगवान शिंदे आपल्या मित्रांसमवेत उभा होता. जायभाय यांनी शिंदे यास बाजूला हो, असे म्हणताच त्याने अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली. तसेच त्यांना मारहाण केली. तसेच माझे कोणी काहीच करू शकत नाही, असे म्हणत जायभाय यांच्या सरकारी गणवेशाच्या डाव्या बाजूचा खिसा फाडला. या झटापटीत जायभाय यांच्या ताब्यात असलेली परिवहन मंडळाची तीन हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम गहाळ झाली.

दरम्यान या प्रकरणी जायभाय यांच्या फिर्यादीवरून विवेक भगवान शिंदे याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण हे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)