तुळजापूरला जादा बसगाड्या गेल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे हाल

File photo

बारा मार्गावरील एसटी बस सेवा बंद

जामखेड – कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर दर्शनासाठी जामखेड अगाराने 20 बस गाड्या पाठविल्या आहेत. त्यामुळे जामखेड अगारातून जाणाऱ्या मुख्य बारा मार्गावरील या 20 बस तीन दिवसांपासून बंद राहणार असल्याने प्रवाशांबरोबरच परीक्षेसाठी जाणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोजागरी पोर्णिमेनिमित्त लाखो भावीक महाराष्ट्रातून दर्शनासाठी तुळजापूर येथे येत असतात, तसेच कर्नाटकातूनदेखील अनेक भाविक रेल्वेने सोलापूरात येऊन पुन्हा एसटी बसने तुळजापूरला जात असतात. त्यामुळे बसस्थानक परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. त्यांची अडचण होऊ नये म्हणून, अहमदनगर जिल्ह्यातूनही तुळजापूरकडे जादा बस गाड्या पाठविण्यात आल्या आहेत. यामध्ये जामखेड अगारातूनदेखील वीस एसटी बस पाठवण्यात आल्या आहेत. जामखेड अगारात एकूण 62 बसेस आहेत तर, या अगाराचे दररोजचे उत्पन्न पाच ते साडेपाच लाखापर्यंत आहे. तुळजापूरला बस पाठविण्यात आल्याने जामखेड येथील एसटीबसच्या वेळापत्रकावर याचा परिणाम झाला आहे.

या मध्ये सकाळपासून सुटणाऱ्या जामखेड-नाशिक, जामखेड-पैठण, जामखेड-कुर्ला, चौसाळा-ईट-भूम, कौडाणे मुक्कामी, देवदैठण मुक्कामी, नगर-पिंपरखेड मुक्कामी, खर्डा मुक्कामी, बारामती मुक्कामी, दौंड-पुणे मुक्कामी, नगर-पुणे, व करमाळा अशा बारा मार्गावरील बस तुळजापूर येथे पाठविण्यात आल्याने प्रवाशांची असुविधा झाली आहे.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये तालुक्‍यात 2100 विद्यार्थी तर 1730 विद्यार्थिनी आहेत. अशा एकूण 3830 विद्यार्थी दररोज एसटीबसने प्रवास करतात. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. बाहेरगावच्या अनेक भागात मुक्कामी गाड्या न गेल्याने विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल होत आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी जाण्यासाठी बसची वाट पाहत ताटकळत बसावे लागत आहे. शेवटी परीक्षेला येण्यासाठी नाईलाजास्तव खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

“पोर्णिमेनिमित्ताने तुळजापूर दर्शनासाठी महाराष्ट्रातून भावीक जात असतात. त्यामुळे जामखेड अगारातून तुळजापूरला तीन दिवसांसाठी वीस बस पाठवण्यात आल्या आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणून तालुक्‍यात जाणाऱ्या मुक्कामी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तीन दिवसानंतर एसटी बस सेवा पुन्हा पुर्ववत होईल.
– महादेव क्षिरसाठ, आगारप्रमुख, जामखेड

परिणामी एसटी बसचे पास असूनही विद्यार्थ्यांना नाहक खासगी वाहनांमुळे आर्थिक झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर तालुक्‍यातील मुक्कामी जाणाऱ्या बयगाड्या पाठवण्याची व्यवस्था आगारप्रमुखांनी करावी अशी मागणी प्रवाशांबरोबर व विद्यार्थ्यांनी केली आहे. याबाबत प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष गजानन फुटाणे व सुनील शिंदे यांनी आगारप्रमुखांची भेट घेऊन तातडीने एसटीबस सेवा पुर्ववत करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)