जामखेड दरोड्यातील आरोपी सहावर्षानंतर जेरबंद

नगर – जामखेड येथील सराफ दुकानांवर 2012 मध्ये टाकलेल्या दरोड्यातील पसार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केले आहे. अमर सुभाष भोसले ऊर्फ आवड्या ऊर्फ सहदेव (वय 25, रा. वडघुल, ता. श्रीगोंदे) असे आरोपीचे नाव आहे.

आवड्याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सराफ अमोल पंडित (रा. नान्नज, जामखेड) यांच्या दुकानावर 19 डिसंबर 2012 मध्ये दरोडा पडला होता. या दुकानातून सुमारे 11 लाख 10 हजार रुपयांचा दागिने दरोडेखोरांनी चोरून नेले होते.

-Ads-

या गुन्ह्यातील काही आरोपी पसार झाले होते. त्याचा शोध अजूनही सुरू आहे. त्यातील आरोपी आवड्या याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केले. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
42 :thumbsup: Thumbs up
33 :heart: Love
0 :joy: Joy
5 :heart_eyes: Awesome
3 :blush: Great
6 :cry: Sad
11 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)