जामखेड (प्रतिनिधी) : येथील सहावीत शिकणाऱ्या हर्षवर्धन राऊत या मुलाने गल्ल्यात साठवलेल्या पैशातून शिवभोजन योजनेला देणगी देत आपला वाढदिवस आगळावेगळा पध्दतीने साजरा केला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
येथील पत्रकार राजेश राऊत व मधुराणी राऊत यांचा चिरंजीव हर्षवर्धन राऊत यांचा आज वाढदिवस होता पण सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे शहरात लाॅकडाऊन असल्याने गरिबांचे जेवणासाठी मोठा हाल होत आहेत वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत शिवभोजन थाळीचा एक दिवसाचा खर्च उचलुन वाढदिवस साजरा केला ११ वर्षाच्या या ईतक्या लहान वयात सामाजिक जाणीव येणे हे महत्वाचे आहे.
आजी आजीबा व माता पिता यांच्या संस्कारातुन हे घडले असावे. कडा येथे शिवभोजन योजनेतून गरीब आणि गरजू व्यक्तींना पाच रुपयात जेवण दिले जाते. कड्यातील पत्रकारांनी हे पाच रुपये देखील देण्याची गरज पडू नये यासाठी पहिल्या दिवसाचा खर्च उचलला होता त्याचे अनुकरण करत अनेक दानशूर व्यक्ती यात सहभागी झाल्या.त्यामुळे आता या केंद्रातील भोजनाचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींना मोफत भोजन मिळते.
रविवारी दि २६ एप्रिल रोजी हर्षवर्धन राऊत याचा वाढदिवस होता त्याने आपल्या गल्लायत साठवलेली रक्कम शिवभोजनसाठी एक दिवसाचा खर्च म्हणून दिली.शहरातील नागरिकांनी व पत्रकारांनी हर्षवर्नधच्या या कृतीचे कौतुक केले आहे.