जामखेड – शासनाच्या वतीने शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिव्हाळा फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली खर्डा चौकात उद्या सकाळी अकरा वाजता शेतकऱ्यांनाबरोबर घेवून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी दिला आहे.

खर्डा चौकातुन सकाळी ठीक अकरा वाजता या आंदोलनास सुरुवात करण्यात येणार आहे. या नंतर हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी उडीद, मुगाची काढणी सुरू केली. मात्र, हमीभाव केंद्रच सुरू करण्यात आले नसल्यामुळे कवडीमोल दराने मालाची विक्री शेतकऱ्यांना करावी लागली आहे.आता शेतकरी व्यापाऱ्यांकडून पूर्णत: नागवला गेल्यानंतर शासनाने हमीभाव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र अद्यापही शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले नाहीत. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकरी हा शेतमाल पिकत नव्हते म्हणून आत्महत्या करत होता. आता विकत नाही म्हणून आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, त्यामुळे शासकीय खरेदी हमीभाव केंद्र सुरु करण्याचे मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात जिव्हाळा फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सुनिल लोंढे, प्रा.मधुकर राळेभात, शहाजी डोके, झीक्रीचे सरपंच चंद्रकांत साळुंके यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)