जामखेड-करमाळा रस्ता महिन्यातच उखडला

पालकमंत्री काय कारवाई करणार

जामखेड ते चुंबळी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र एकाच महिन्यात हा रस्ता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जवळ उखडला आहे. रस्त्यांच्या भूमिपूजना दरम्यान पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे आवर्जून आपल्या भाषणात सांगतात की रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला तर संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाईत होणार मात्र या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याबाबत पालकमंत्री काय कारवाई करतात. याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

जामखेड – जामखेड करमाळा रस्त्याच्या साईडपट्या वाढवून रुंदीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र शहरापासून काही अंतरावर असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थे जवळ केलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे एका महिन्यातच उखडला आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांनी तालुक्‍यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याच अनुशंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत जामखेड तालुक्‍यातील साकत रस्ता, नान्नज ते बोर्ला फाटा व जामखेड ते चुंबळी अशा एकुण 2 कोटी 19 लाख रुपये मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे सुरु आहेत. यामध्ये तीन मोऱ्यांच्या कामांचा समावेश आहे.

सध्या जामखेड करमाळा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम जोरात सुरू असले तरी दुसरीकडे जामखेडपासुन काही अंतरावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जवळ हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असल्याचे दिसुन येत आहे. पूर्वी जुन्याच डांबरी रस्त्यावर कसलीही डागडुजी न करता तसेच खडी व डांबर मिक्‍स करून रस्ता बनवला आहे, मात्र खालील जुन्या रस्त्यावर नविन डांबर टाकुन रस्ता केला आहे. मात्र डांबरीकरण व्यवस्थित न झाल्याने या डांबराने पकड धरली नाही. त्यामुळे यावरुन वाहने जात असल्याने एका महिन्यातच हा रस्ता उखडला आहे.

तसेच शहरातील चौफुला ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेपर्यंत जुन्याच रस्त्यावर नविन रस्ता केल्याने पाहीजे. तशी लेवल झाली नाही. त्यामुळे छोटी वाहने व मोटारसायकल हेलकावे चालत आहेत. साईडपट्या देखील काही ठिकाणी खचल्या असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. विषेश म्हणजे यापूर्वी देखील या रस्त्याच्या साईड पट्ट्यांना माती मिश्रित मुरुम वापरण्यात आला होता.

यापूर्वी देखील अनेक ठिकाणी जामखेड करमाळा रस्त्याच्या साईड पट्या खचल्या असल्याने अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी केली आहे. त्यातच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जवळ हा रस्ता उखडला असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नसुन लवकरात लवकर या ठिकाणची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांकडुन होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)