जेम्स बॉण्डचा ‘२५’ वा चित्रपट लवकरच सिनेमागृहात

२८ एप्रिलपासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला होणार सुरवात

गेले पाच दशकापेक्षा जास्त काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ‘जेम्स बॉण्ड’ ही व्यक्तिरेखा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इतिहासातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखांपैकी एक ‘जेम्स बॉण्ड’ ही अतिशय लोकप्रिय आहे. त्यामुळे जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ‘जेम्स बॉण्ड’ चित्रपटाचे जबरदस्त चाहते आहेत. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

या चित्रपटाची कथा रेमंड बेन्सन यांच्या “Never Dream of Dying” या कादंबरीवर आधारित आहे. जमायका येथे २८ एप्रिल २०१९ पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात होणार असून, जपान आणि दक्षिण फ्रान्समध्ये देखील चित्रीकरण होणार आहे.

या चित्रपटामध्ये यावेळी देखील हॉलीवूडचा सुपरस्टार ‘डेनियल क्रेग’ हा जेम्स बॉण्डची व्यक्तीरेखा साकारणार आहे. विशेष म्हणजे डेनियल क्रेग तब्बल पाचव्यांदा एजंट 007 (जेम्स बॉण्ड) ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी त्याने तब्बल ४५० कोटी रुपयांचं मानधन स्वीकारल्याचं सांगण्यात येत आहे. ‘डेनियल क्रेग’ २००६ पासून जेम्स बॉण्ड ही भूमिका साकारत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)