वाराणसी: मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी ‘मेजर रमेश उपाध्याय’ निवडणूक रिंगणात उतणार आहेत. उपाध्याय यांनी हिंदू महासभेच्या तिकिटावर उत्तरप्रदेशातील बालिया लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी दाखल केला. त्यानंतर त्यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने शहीद हेमंत करकरेंबाबत केलेल्या वक्तव्याचं समर्थन देखील आहे.
“कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला कुठेही मृत्यू आल्यास त्यांना शहीद म्हणता येत नाही. केवळ स्वातंत्र्य
सैनिक आणि सैनिकच शहीद होतात. पोलिस कधीच शहीद होत नसतात”, असं वादग्रस्त वक्तव्य उपाध्याय यांनी केलं आहे.