जम्मू काश्‍मीरमध्ये जमात ए इस्लामीच्या 150 जणांची धरपकड

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरमध्ये पोलिसांनी शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईदरम्यान जमात ए इस्लामीच्या 150 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये जमात ए इस्लामीचा म्होरक्‍या अब्दुल हमिद फयाझ याचाही समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्यघटनेच्या 35 अ कलमाबाबत सुनावणी सुरु होत असल्याने जम्मू काश्‍मीरमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभुमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

राज्यघटनेच्या कलम “35 अ’नुसार जम्मू काश्‍मीरच्या स्थानिक रहिवाशांना विशेष अधिकार आणि स्थानिकांचा हक्क मिळतो. या कलमासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी सुरु होणार होती. त्यामुळे जम्मू काश्‍मीरमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सुरक्षा बंदोबस्त असला तरी ठिकठिकाणी लोक गटागटाने उभे असल्याचे दिसत होते. सुरक्षिततेसाठी निमलष्करी दलाच्या 100 अतिरिक्‍त तुकड्या काश्‍मीर खोऱ्यात पाठवून देण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी जमात ए इस्लामीचे नेते अमीर जमाल, डॉ. अब्दुल हमिद फयाझ आणि ऍड. झाहिद अली यांच्या समवेत जम्मू काश्‍मीर लिबरेशन फ्रंटचा म्होरक्‍या यासिन मलिक यालाही ताब्यात घेतले आहे. गेल्या 24 तासात हुर्रियत नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“जमात ए इस्लामी’ही संघटना हिज्बुल मुजाहिदीनशी संबंधित राजकीय पक्ष असल्याचे मानले जाते. मात्र आपला पक्ष केवळ सामाजिक आणि धार्मिक कार्याशी संबंधित असल्याचे या गटाचे म्हणणे आहे. जमात ए इस्लामीच्या कार्यकर्तांची धरपकड, अनेक ठिकाणी छापे आणि अटकसत्रामुळे अस्थिरता निर्माण केली जात आहे, अशी टीका या संघटनेकडून केली गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)