जालना – जालना शहरातील रामनगर कॉलनीत अमेरिकन बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश भिंगारे आणि शेख हकीम उर्फ पप्पू असे या दोन आरोपींची नावे आहेत.
शुक्रवारी रात्री अचानक जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नीलेश भिंगारेच्या घरावर धाड टाकून झडती घेतली. त्यावेळी पोलिसांना अमेरिकन बनावटीचे पिस्तूल सापडले. निलेशने आपल्याकडे पिस्तूल असून ते मित्राकडे ठेवल्याची कबुली दिली. आणि त्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्याचा मित्र शेख हकीम (पप्पू)ला मंठा चौफुलिमधून अटक केली. पप्पूच्या घराची झडती केल्यानंतर घरात अमेरिकन बनावटीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले. त्यानंतर या दोघांना केली असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मागर्दर्शनाखाली पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे.