जकार्ता आशियाई खेळ 2018: नीरज चोप्रा भारताचा ध्वजवाहक

राष्ट्रकुल स्पर्धेतील यशानंतर सर्व भारतीय खेळाडूंना वेध लागले आहेत ते आशियाई खेळांचे. या स्पर्धेमध्ये भारतासाठी पदक मिळवणे ही खूप मोठी बाब असते. त्याचबरोबर जो खेळाडू खूप चांगली कामगिरी करत आहे आणि पदक जिंकून देऊ शकतो त्याला ध्वजवाहक होण्याचा मान मिळत असतो.
यावेळच्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचा ध्वजवाहक होण्याचा मान हा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला मिळाला आहे. याबातचा कोणताही खुलासा भारतीय क्रीडामंत्रालय किंवा भारतीय ऑलंपिक समितीने अद्याप केला नसला तरी याची अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते.
राष्ट्रकुल स्पर्धेत हा मान पीव्ही सिंधूला मिळाला होता. यंदाच्या आशियाई स्पर्धा १८ ऑगस्ट  ते ०२ सप्टेंबर या कालावधीत जकार्ता येथे होणार आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)