जेटलींचा खासदार निधी सोनिया गांधींच्या मतदारसंघात वापरणार 

लखनौ: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली त्यांचा खासदार निधी “युपीए’अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली या लोकसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी खर्च करणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीमध्ये गांधी कुटुंबाचे प्रस्थ मोडून काढण्यासाठी भाजपच्यावतीने ही चाल खेळली जाणार आहे, असे उत्तर प्रदेशातील भाजप प्रवक्‍ता हिरो बाजपेयी यांनी सांगितले.
राज्यसभेचे खासदार असलेल्या जेटली यांनी महिन्याभरापूर्वीच आपला खासदार निधी खर्च करण्यासाठी रायबरेलीची निवड केली आहे. प्रमुख राजकीय घराण्याकडे प्रतिनिधीत्व असूनही रायबरेली जिल्हा मागास राहिला आहे. जिल्ह्यातील अनेक मागण्या प्रलंबितच आहेत. म्हणून जेटली यांनी या जिल्ह्याची निवड केली आहे, असे या प्रवक्‍त्याने सांगितले.
लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास योजनेत प्रत्येक खासदाराला आपल्या आवडीच्या जिल्ह्याची विकासकामांसाठी निवड करायची असते. त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 5 कोटी रुपयांची विकासकामे करणे अपेक्षित आहे. राज्यसभेच्या खासदारांना ते निवडून आलेल्या राज्यातील एकापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये अशी विकासकामे करता येऊ शकतात. अर्थमंत्री जेटली हे येत्या 1-2 आठवड्यात रायबरेलीचा दौरा करणार आहेत, असेही बाजपेयी यांनी सांगितले. मात्र पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणूकीत सोनिया गांधींविरोधात जेटलींची निवडणूक लढण्याची कोणतीही शक्‍यता त्यांनी फेटाळून लावली.
प्रलंबित मागण्या पूर्ण करणार… 
रायबरेलीमध्ये स्टेडियम, विद्यापिठ जिल्ह्यातील दुर्गम भागात सौर उर्जा प्रकल्प, सौर उर्जेवर चालणारे पंप आदींची मोठी मागणी आहे. याशिवाय जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न जेटली यांच्या खासदार निधीतून केला जाईल, असेही बाजपेयी यांनी सांगितले. 1980 साली यांनी रायबरेलीचे आणि राजीव गांधी यांनी अमेठीचे प्रतिनिधीत्व केले होते. सध्या रायबरेली हा सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे, तर शेजारील अमेठी हा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ आहे. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)