जेव्हा जेटली स्वपक्षीयांनाच “माँ-बेटे चोर है!”च्या घोषणा बंद करण्याचा इशारा देतात…

नवी दिल्ली : लोकसभेमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान आज राफेल प्रकरणावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लावलेल्या आरोपांमुळे सभागृहाचे तापमान चांगलेच वाढले होते. राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देताना केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी देखील काँग्रेस अध्यक्षांवर चांगलीच आगपाखड केली. मात्र जेटली सभागृहामध्ये बोलत असताना त्यांच्याच मागे बसलेले अनुराग ठाकूर यांनी “माँ-बेटे चोर है!”च्या घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर जेटली यांनी त्यांना गप्प बसण्याचा इशारा केला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अरुण जेटली आज सभागृहामध्ये राहुल गांधींनी केलेल्या टीकेला उत्तर देत होते, जेटली म्हणाले की, “राहुल गांधी हे एक अत्यंत खोटारडे व्यक्ती असून, खोटे बोलणे हा त्यांच्या स्वभावच आहे.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान जेटली बोलत असतानाच त्यांच्यामागे बसलेल्या अनुराग ठाकूर यांनी “माँ-बेटे चोर है!”च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. ठाकूर यांच्या सुरत सूर मिसळत सभागृहातील भाजपच्या अन्य सदस्यांनी देखील “माँ-बेटे चोर है!”च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. भाजपच्या सदस्यांच्याच घोषणांमुळे जेटली यांच्या भाषणास व्यत्यय आल्याने त्यांचे भाषण काही वेळासाठी थांबवावे लागले. बोलण्यामध्ये व्यत्यय येत असल्याने संतापलेल्या जेटलींनी स्वपक्षीय सहकारी असलेले अनुराग ठाकूर यांना इशारा करून घोषणा बंद करण्यासाठी बजावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)