जेटली भाजप महायुतीचे ‘विदूषक’ : काँग्रेस

नवी दिल्ली : भाजपचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांनी आपल्या ब्लाॅगद्वारे काँग्रेस पुरस्कृत महागठबंघनवर काल जहरी टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसतर्फे अरुण जेटली यांच्या टीकेस सडेताेड प्रतिउत्तर देण्यात आले असून काँग्रेसतर्फे अरुण जेटली यांचा उल्लेख भाजपच्या महायुतीचे ‘विदूषक’ असा करण्यात आला आहे.

अरुण जेटली यांच्या ब्लाॅगला उत्तर देताना आज काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी भाजपच्या बुडत्या जहाजातून त्यांचे अनेक मीत्रपक्ष बाहेर पडत असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसची महाआघाडी वीचारांवर आधारित आहे तर भाजपची यूती केवळ निवडणुकीची गणिते लक्षात ठेवून करण्यात आल्याचा आरोप देखील लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)