श्रीनगर – काश्मीर येथे ईदनिमित्त विविध रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये काश्मीरमधल्या अनेक तरुणांनी जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि इसिसचे झेंडे फडकवले आहेत. यादरम्यान सुरक्षाबल आणि दहशतवादी संघटनांचे झेंडे फडकवणाऱ्या तरुणांमध्ये मारहाण देखील झाली आहे .
Jammu and Kashmir: Stones pelted at security forces near Jamia Masjid in Srinagar; and posters supporting terrorist Zakir Musa and UN designated terrorist Masood Azhar seen in the area. pic.twitter.com/qu7uea90YO
— ANI (@ANI) June 5, 2019
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीनगरमधील जामा मशीदीजवळ जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर तसेच जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि इसिसचे झेंडे फडकवले आहेत. मसूद अझहरला संयुक्त राष्ट्र संघाकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. त्याचप्रमाणे काही दिवासांपूर्वी ज्याला भारतीय जवानांनी कंठस्नान घातले त्या दहशतवादी जाकीर मुसा या दोघांची छायाचित्र लावण्यात आली होती. दरम्यान, झाकीर मुसाच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी झाली होती. गर्दीतील काही तरुणांनी मुसाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या असून काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकारही घडले होते.