पुलवामामध्ये जैश ए मोहंम्मदचे 4 दहशतवादी ठार

श्रीनगर: जम्मू काश्‍मीरच्या दक्षिणेकडील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये जैश ए मोहंम्मद या दहशतवादी संघटनेचे चार दहशतवादी मारले गेले. यापैकी एकजण पाकिस्तानी असल्याचा संशय आहे, असे पोलिसांनी सांगितले.

पुलवामाच्या हंजान भागात दहशतवादी असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी आज सकाळी या भागाची नाकाबंदी केली आणि शोधमोहिमेला सुरुवात केली. ही शोधमोहिम सुरु असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये चार दहशतवादी ठार झाले. यापैकी तिघांची ओळख पटली असून ते पुलवामातील रहिवासी होते. तर एकजण पाकिस्तानातील असल्याचा संशय आहे. घटनास्थळावरून रायफली आणि अन्य गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व दहशतवादी सुरक्षा दलांवरील हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये वॉन्टेड होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)