आज जेलभरो आंदोलन 

लातुरमध्ये 8 जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न:बीडमध्ये एकाची आत्महत्या 
मुंबई/लातूर
मराठा संघटनांनी 1 ऑगस्ट रोजी राज्यात सर्वत्र जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.दरम्यान आरक्षण आंदोलनाची तीव्रता कायम असून लातुर जिल्ह्यातील औसा येथे आठ मराठा आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.तसेच बीडमधील एका युवकाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली असून त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे नोकरी लागत नसल्याचे त्याने म्हटले आहे.

सध्या सुरु असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणूनच सकल मराठा समजाच्यावतीने उद्या म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.मराठा समाजाच्या वतीने चालू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा म्हणून 1 ऑगस्टला जेल भरो आंदोलन होणार असल्याचे सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले.मुंबईतील आझाद मैदानातून सकाळी 11 वाजता या आंदोलनाला सुरुवात होत आहे. या आंदोलनासाठी सकल मराठा समाजाकडून काही मागण्या प्रामुख्याने समोर ठेवण्यात आल्या आहेत.25 जुलै बंद दरम्यान दाखल केलेले सरसटक खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत,कळंबोली येथे महिलांवर केलेल्या बेछुट लाठीचार्ज आणि गोळीबार संदर्भात सदर अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी,समाजासाठी ज्यांनी प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीला 50 लाख रुपये व जखमींना 10 लाख रुपये देण्यात यावेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राम कदम यांनी मराठा समाजाविषयी जातीवाचक बोलून समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल व बंद दरम्यान झालेल्या हिंसेची जबाबदारी स्वीकारून समाजाची जाहिर माफी मागून राजीनामा द्यावा अशा मागण्या आहेत.या मागण्या घेऊन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट 2018 पासून जेल भरो आंदोलन सुरू होईल, असे सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

-Ads-

लातूर जिल्ह्याच्या औसा तहसिल कार्यालयात 8 आंदोलकांनी एकत्रपणे आत्मदहनाचा प्रयत्न केला. औसा तालुक्‍यातील टाका येथील महेश शिंदे, राजकिरण साठे, चैतन्य गोरे, रविकांत पाटील, जगदीश शिंदे, शिवाजी सावंत, विलास शिंदे, अजित शिंदे या आठ युवकांनी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेतले. यावेळी पोलिसांनी तात्काळ या तरूणांना रोखून ताब्यात घेतले. त्यानंतर तब्बल दीड तास तहसीलदारांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करुन सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, त्याकरिता प्रशासन पाठपुरावा करील असे लेखीपत्र दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.

तहसीलदारांच्या कॅबीनमध्ये तब्बल दीड तास चाललेल्या आंदोलनानंतर औसा विश्रामगृहात सकल मराठा समाज बांधवांची बैठक झाली यावेळी ऑगस्ट क्रांती दिनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला
चौकट

आणखी एकाची आत्महत्या
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यातील अभिजित देशमुख (वय 35 वर्ष) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेली ही सातवी आत्महत्या आहे. अभिजित देशमुख यांनी मंगळवारी (31 जुलै) सकाळी घराजवळील एक झाडाला गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. त्यांच्या खिशात चिट्ठी सापडली असून त्यात मराठा आरक्षण, बॅंकेचे कर्ज आणि औषधांचा खर्च या कारणाने आत्महत्या करत आहे, असे लिहिल्याचे आढळले आहे.विज्ञान विषयातून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेले अभिजित देशमुख नोकरी नसल्याने अस्वस्थ होते. त्यांच्यासह कुटुंबीयांवर बॅंकेचे कर्जही होते. आरक्षण न दिल्याने नोकरी नाही आणि व्यवसाय करण्यासाठी बॅंकेचे कर्जही मिळत नसल्याची बाब त्यानं मित्रांकडे व्यक्त केली होती. शिवाय, सध्या आरक्षण मागणीच्या विविध आंदोलनात त्याने सक्रिय सहभाग घेतला होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)