“जय जवान, जय किसानसह आता जय अनुसंधान’चा नारा द्यायला हवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतीय विज्ञान कॉंग्रेसच्या 106व्या सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधन

जालंधर: लाल बहादूर शास्त्रींच्या “जय जवान जय किसान’ आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या “जय विज्ञान’ या वाक्‍यांचे स्मरण करुन आता यानंतर एक पाऊल पुढे “जय अनुसंधान’ असा नारा द्यायला हवा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. गहन आणि विघटनवादी माहिती संदर्भात तसेच सामाजिक-आर्थिक भवितव्यासाठी ज्ञानाचा उपयोग ही दोन ध्येय गाठण्यासाठी विज्ञान आत्मसात करण्याबाबतही त्यांनी जोर दिला. आज भारतीय विज्ञान कॉंग्रेसच्या 106 व्या सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.

संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्राचे प्रोत्साहन
केंद्र सरकारने, 3600 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या “नॅशनल मिशन ऑन इंटर डिसिप्लिनरी सायबर फिजिकल सिस्टीम’ ला मंजूरी दिली असून, या अभियानाद्वारे संशोधन आणि विकास, तंत्रज्ञान विकास, मनुष्यबळ विकास आणि कौशल्य, स्टार्ट अप इको सिस्टीम इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे. कार्टो सॅट डोन आणि इतर उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणासंदर्भात माहिती सांगितली. वर्ष 2022 मध्ये गगन यान द्वारे भारतीयांना अंतराळात सोडण्याच्या कार्य प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. प्रायमिनीस्टर्स रिसर्च फेलोशीपमुळे हजारो हुशार विद्यार्थ्यांना देशभरात संशोधन करण्याची संधी मिळणार आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर्षीच्या “भारताचे भविष्य: विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या संकल्पनेसंदर्भात बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नविनतम शोध यांचा लोकांशी जोडण्यात येणारा संबंध हे भारताच्या बळकटीसाठी महत्वाचे आहे. त्यांनी जे सी बोस, सी व्ही रमण, मेघानंद सहा, एस एन बोस या भारतीय शास्त्रज्ञांचे स्मरण केले. या सर्व शास्त्रज्ञांनी किमान स्रोत आणि कमाल लढा या द्वारे देशाच्या नागरिकांसाठी सेवा उपलब्ध केल्या.

शेकडो भारतीय शास्त्रज्ञांच्या जीवनकार्यामुळे राष्ट्र निर्मितीला तंत्रज्ञान विकासाची जोड मिळून भौतिक संसाधने उपलब्ध झाली आहेत. आजच्या आधुनिक विज्ञान दृष्टीकोनामुळे भारताने वर्तमान परिवर्तनाचा वसा भारताच्या भविष्याचे संरक्षण करण्यासाठी घेतला आहे. आपण विज्ञान जैव पद्धतीच्या संशोधनाला प्रोत्साहन देतांना स्टार्ट अप आणि नवीन शोध यावर प्रकाश टाकायला हवा, असे पंतप्रधान म्हणाले. सरकारने अटल इनोव्हेशन मिशन चालू केले असून, याद्वारे शास्त्रज्ञांना त्यांच्या शोध प्रक्रियेत मदत मिळेल, असेही ते म्हणाले.

लोकांच्या राहणीमान सुलभतेसाठी कार्य करावे. कमी पाऊस पडणाऱ्या क्षेत्रामध्ये दुष्काळ व्यवस्थापन, पूर्व आपत्ती पूर्वसूचना पद्घत, मुलांचे आजार इत्यादी क्षेत्रांबाबत संशोधन करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांना केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)