पाटणा विद्यापिठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी जेडियुची बाजी

पाटणा: पाटणा विद्यापिठातील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदावर संयुक्‍त जनता दल प्रणित “द छात्र’संघटनेने बाजी मारली आहे. “जेडियु’ने विद्यार्थी संघटनेच्या कोषाध्यक्षपदावरही आपला उमेदवार निवडून आणला आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि सहसचिव पदांवर विजय मिळवला आहे. पाटणा विद्यापिठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी छात्र संघटनेचा उमेदवार निवडून येण्याची ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी या संघटनेला 2012 साली विद्यार्थी संघटनेच्या सहसचिव पदांवरच समाधान मानावे लागले होते.

यावर्षीच्या निवडणूकांमध्ये छात्र आणि अभाविपमध्ये एकमेकांच्या विरोधात जोरदार प्रचार झाला होता. “जेडियु’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी पक्षाचे संबंध वापरून या निवडणूकीमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप भाजपने केला होता.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)