जॅकलीन फर्नांडिसने मिकीची मागितली माफी

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने आपल्या इंस्टाग्रामवर एक टिक-टॉक व्हिडिओ शेअर केला होता. यात जॅकलीन एक विनोद करताना दिसते. या व्हिडिओत बीटाउनमधील प्रसिद्ध डिझायनर मिकी कॉन्ट्रॅक्‍टरही आहेत, जे तिच्या विनोदावर हसताना दिसतात. हा व्हिडिओ पोस्ट करत जॅकलीनने माफीही मागितली आहे.

या टिक-टॉक व्हिडिओमध्ये जॅकलीन “कपिल शर्मा शो’मधील बच्चा यादवचा एक चुटकुला सांगते. यावेळी जॅकलीन खूपच मजेशीर अशी आपल्या ओठांची हालचाल करते आणि विनोदी हास्य करते. हा व्हिडिओ पोस्ट करत जॅकलीनने मिकीची माफी मागितली आहे. जॅकलिनने पोस्ट केले की, सॉरी मिकी, मी तुझ्यासोबत असे केले. यासोबत तिने लाफिंग आणि किस इमोजी पोस्ट केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, जॅकलीनचे स्टेटस वाचले असता तिने मिकीला जबरदस्ती या टिक-टॉक व्हिडिओमध्ये सहभागी केल्याचे दिसून येते. यामुळेच तिने मिकीची माफी मागितली असल्याचे दिसून येते. आता यात किती खरे आणि किती खोटे आहे, हे जॅकलीन आणि मिकी यांनाच माहिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)